Site icon स्पार्क 24 मराठी बातमी

IND-W vs Eng W इंग्लंडविरुद्धच्या सलग सहाव्या टी-20 मालिकेत भारताचा पराभव.

IND-W vs Eng W इंग्लंडविरुद्धच्या सलग सहाव्या टी-20 मालिकेत भारताचा पराभव.

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची सलग सहावी टी-२० मालिका गमावली आहे. महिला संघाने इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका कधीही जिंकलेली नाही. 2006 मध्ये भारताने एकमेव सामन्यात इंग्लंडचा 1-0 असा पराभव केला होता. भारतीय महिला क्रिकेट संघाने शनिवारी इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना गमावला. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. इंग्लंडने हा सामना चार गडी राखून जिंकला आणि मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.

इंग्लंडची कर्णधार हीदर नाइटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडिया 16.2 ओव्हरमध्ये 80 रन्सवर ऑलआऊट झाली. इंग्लंड संघाने 11.2 षटकात 82 धावा करत सामना जिंकला.

भारत: स्मृति मंधाना, हरमनप्रीत कौर (कप्तान), ऋचा घोष (विकेटकीपर), जेमिमा रोड्रिग्ज, शेफाली वर्मा, दीप्ति शर्मा, श्रेयंका पाटिल, पूजा वस्त्राकर, तितास साधू, रेणुका ठाकुर सिंह, सायका इशाक.

इंग्लैंड: सोफिया डंकले, हीथर नाइट (कप्तान), एमी जोन्स (विकेटकीपर), डेनियल वायट, एलिस कैप्सी, नताली सीवर ब्रंट, फ्रेया केम्प, सोफी एक्लेस्टोन, चार्लोट डीन, सारा ग्लेन, लॉरेन बेल.

Exit mobile version