Blog

Redmi Note 13 हा स्मार्टफोन 200 मेगापिक्सेलसह भारतात लवकरच होणार लॉन्च.

भारतात Redmi Note 13 सीरीज ची लॉन्चीग तारीख जाहीर करण्यात आली. Redmi Note 13 हा भारतात 4 जानेवारी 2024 रोजी लॉन्च करण्यात येणार असल्याचे Redmi India च्या वेब साईटवर जाहिर करण्यात आले आहे. ब-याच दिवसापासून चर्चेत असलेला Redmi Note 13 व Note 13 pro भारतात लॉन्च होणार आहे.

 

Redmi Note 13 सीरीज हि चीनमध्ये यापूर्वीच लॉन्च करण्यात आली असून भारतात हि स्मार्टफोन सिरीज नवीन वर्षाच्या सुरवातीलाच आपल्या भेटीला येत आहे. Redmi Note 13 pro मध्ये चा 200 मेगापिक्सेल चा बॅक कॅमेरा तर 16 मेगापिक्सेल चा फंट केमेरा दिला जाऊ शकतो.
Redmi Note 13 व Note 13 pro या दोन्ही मॉडेल्समध्ये 6.67 इंचीचा सीरीज AMOLED डिस्प्ले असू शकतो . तसेच डिस्प्ले गोरीला ग्लास प्रोटेक्‍ट दिले जाणार आहे. हा डिस्प्ले फुल एचडी प्लस रिझोल्यूशनसह देण्यात येईल, ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज असणार आहे.
Redmi Note 13 मध्ये 108 मेगापिक्सेल MPकॅमेरा असू शकतो, तर Pro मॉडेलमध्ये 200 मेगापिक्सेल (MP) सेंसर असण्याची शक्यता आहे. यासोबत 8 MP अल्ट्रा-वाईड आणि 2 मेगापिक्सेल (MP)डेप्थ आणि मॅक्रो कॅमेरे असणार आहे. कनेक्टिव्हिटी पर्याय हया फोन ड्युअल सिम , वायफाय 5, ब्लूटूथ 5.2, यूएसबी टाइप-सी , 5000 mAh बॅटरी , 33 वॅट फास्ट चार्जर सह Redmi Note 13 व Redmi Note 13 pro लवकरच भारतात येतील .

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *