Ravindra Berde : जेष्ठ मराठीअभिनेते रवींद्र बेर्डे यांचे वयाच्या 78 व्या वर्षी झाले निधन.
Ravindra Berde : जेष्ठ मराठीअभिनेते रवींद्र बेर्डे याच्यां निधनाची वार्ता ऐकूण सर्वांना फार दु:ख झाले आहे.
रवींद्र बेर्डे यांनी वयाच्या 78 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. ते काही काळापासून घशाच्या कर्करोगाने त्रस्त होते. त्यांचा उपचार मुबंई मधील टाटा रुग्णालयात चालू होता. त्यांना दोन दिवसापूर्वीच घरी आणण्यात आले होते . अचानक त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
Ravindra Berde
नभोवाणी आणि नाटकक्षेत्र या क्षेत्रामध्ये त्यांचे अनोख्या अभिनयाने अभिनेते रवींद्र बेर्डे यांची वेगळेच स्थान तयार झाले होते. त्यांची अजून एक ओळख म्हणजे ते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे बंधू होते. दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम करुन प्रेक्षकांना भरपूर हसवले. त्यांनी 300 हून अधिक चित्रपटात काम करुन स्व:ताचा मराठी चित्रपटात तसेच हिदी चित्रपट सिंगम मध्ये देखील काम केले आहे. अशोक सराफ, विजय चव्हाण, महेश कोठारे, विजू खोटे, सुधीर जोशी , लक्ष्मीकांत बेर्डे आणि भरत जाधव यांच्या सोबत ब-याच चित्रपटात त्यांना विनोदी व इतर भुमिकेत त्यांना प्रेक्षकाची खुप पंसती मिळली आहे. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली !