शास्त्रानुसार, माणसाचे मन जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे. माणसाच्या जडणघडणीत मनाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितले आहे की मनुष्याचे मन ही त्याच्या मुक्तीचे आणि बंधनाचे कारक आहे. यश मिळवण्यासाठी मन मजबूत असणे आवश्यक आहे. मन मजबूत करण्यासाठी धार्मिक शास्त्रांमध्ये काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. चलाजाणून घेऊया ते उपाय काय आहेत…
1 ) सूर्याला पाणी अर्पण करा:
प्रतिदिन सकाळी स्नान केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करावे. या प्रक्रियेद्वारे तुमचे मन शांत राहील आणि तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल.
2) गायत्री मंत्राचा जप:
नियमितपणे गायत्री मंत्र जप करण्यामुळे मानसिक शांती मिळते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते.
गायत्री मंत्र:
ॐ भूर्भुवः स्वः
तत्सवितुर्वरेण्यं
भर्गो देवस्यः धीमहि
धियो यो नः प्रचोदयात्
साधा आणि सकस आहार घ्या:
धार्मिक मान्यतेनुसार मनःशांतीसाठी सात्विक आहार घेणे गरजेचे आहे. सात्विक आहाराचे सेवन केल्यामुळे आपल्या मनात वाईट विचार येत नाहीत आणि आपले लक्ष विचलित होत नाही.