Blog

Samsung Galaxy सॅमसंग वापरकर्त्यांसाठी सावधानीचा इशारा.

Samsung Galaxy सॅमसंग वापरकर्त्यांसाठी सावधानीचा इशारा. भारत सरकारचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) दिला आहे सावधानीचा इशारा दिला आहे. सॅमसंग मोबाईल सहज हॅक करता येऊ शकतो. आपला डेटा सहज हॅकर्स हॅक करु शकतात. यामध्ये अँड्रॉइड व्हर्जन 11, 12,13 व 14 चालवणा-या मोबाईल करीता विषेश सावधानी घेण्याची आवश्यकता आहे. मोबाईलचे सेक्युरीटी खुपच सर्वसाधारण असल्याने सहज हॅक होण्याची शक्यता आहे.
मोबाईल हॅक होऊ नये या करीता अपडेट करण्याकरीता कळविण्यात आले आहे. आपला सर्व डेटा हा आपल्या मोबाईल मध्ये असल्याने विषेश सावधानी बाळगण्यासाठी सांगितले आहे.

Samsung Galaxy फोनची ऑपरेटिंग सिस्टीम (OS) अपडेट करण्यात अयशस्वी झाल्यास त्यांना संभाव्य धोके येऊ शकतात, ज्यामुळे हॅकर्सना डिव्हाइस सुरक्षिततेपासून दूर जाण्याची आणि संवेदनशील डेटावर अनधिकृत प्रवेश मिळवण्याची संधी मिळते. यामुळे वापरकर्ता फाइल्स आणि आवश्यक माहिती अनधिकृतपणे काढली जाऊ शकते. सॅमसंग टॅब्लेट देखील संवेदनाक्षम असू शकतात. मोबाईल महाग असल्यास तो सुरक्षित असल्याची शास्वती नाही.
हॅकर्सना सुरक्षा सहज निर्बंधांना बायपास करू शकतात, संवेदनशील डेटामध्ये प्रवेश करू शकतात उदा. फोटो , बॅकची माहिती इ. तसेच काह‍ि App मोबाईल मध्ये Download केल्याने हॅकर्स सहज आपली गोपनिय माहिती सहज मिळवू शकतात. हॅकर्स सुरक्षा लेयर बायपास करून संवेदनशील माहितीपर्यंत पोहचू शकतात आणि टार्गेट सिस्टमवर हवा असलेला कोड रन करू शकतो व सर्व माहिती सहज घेऊ शकतो. यापूर्वी देखील सॅमसंग मोबाईल मध्ये अशा प्रकारची घटना घडलेली आहे. हि एक चिंता वाढवणारी बाब आज इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने कळविली आहे.
सॅमसंग मोबाईल वापरकर्त्यांनी आपल्या ॲप मध्ये कॅमेरा परवानगी, ऑडियो, व्हिडीयो इ. परवानगी मागितले जातात त्याकरीता परवानगी न दिल्यास App चालत नसल्याचे दिसून येते. पण आपण या करीता आवश्यक आहे किवां नाही याची पडताळणी केल्या शिवाय App Download करु नये.

 

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *